राम म्हणजे काय ?

 


उगीचच झोपतो त्याला 

    आ राम      म्हणतात. 


झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला

      हे राम म्हणतात.


मित्रा सारखा वागतो म्हणून      

     सखा राम म्हणतात.


   जो राजालाही आदर्श  होऊन राहतो त्याला 

      राजा राम म्हणतात.


हृदयीचे जाणतो म्हणून त्याला

     आत्मा राम  म्हणतात.


एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला   

    सीता राम  म्हणतात.


भगवंत ज्यांचे पाय पूजितो त्यांना

   तुका राम  म्हणतात.


प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला     

    परशु राम म्हणतात. 


जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो त्याला 

     राम दास  म्हणतात.


हल्लीच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला 

     आला राम  म्हणतात.


जो सेवाव्रताने वागतो त्याला    

     सेवा राम  म्हणतात.


जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला 

     मेवा राम  म्हणतात.


आणि


हे ज्यांना कळलं.. त्यांच्यासाठी 

   "राम राम" म्हणतात.


हे वाचणारा सोळा वेळा राम म्हणाला


मोजलेत ना? आता एकूण वीस वेळा राम राम झाले.


चला,एकवीस वेळ रामनाम तर घडले.

         

🙏🪷जय श्रीराम 🪷🙏

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ

Follow